Home संगमनेर संगमनेर तालुका पोलिसांनी तीन दरोडेखोरांना पकडले, दोघे पसार

संगमनेर तालुका पोलिसांनी तीन दरोडेखोरांना पकडले, दोघे पसार

Breaking News | Sangamner Crime: निळवंडे ते कौठे कमळेश्वर रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने थांबलेल्या दरोडेखोरांना संगमनेर तालुका पोलिसांच्या पथकाने मंगळवारी (दि.28) पहाटे पाच वाजेच्या सुमारास पाठलाग करुन पकडले.

Sangamner taluka police nabbed three robbers, two escaped

संगमनेर: निळवंडे ते कौठे कमळेश्वर रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने थांबलेल्या दरोडेखोरांना संगमनेर तालुका पोलिसांच्या पथकाने मंगळवारी (दि.28) पहाटे पाच वाजेच्या सुमारास पाठलाग करुन पकडले. या कारवाईत पोलिसांनी गावठी कट्टा व 4 लाख 61 हजार 650 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पकडलेल्या तीन दरोडेखोरांना न्यायालयात हजर केले असता 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दोघे पसार होण्यात यशस्वी झाले आहे.

 याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांना गुप्त माहिती मिळाली की निळवंडे ते कौठे कमळेश्वर रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने कार (क्र.एमएच.23, ई.6847) थांबलेली आहे.

त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक शलमोन सातपुते, पोहेकॉ. शिवाजी डमाळे, संपत जायभाये, आशिष आरवडे, सचिन उगले, पोकॉ.बाबासाहेब शिरसाठ, प्रमोद चव्हाण यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने मंगळवारी पहाटे सदर ठिकाणी पाठलाग करुन कारमध्ये असलेले दरोडेखोर ललित अनिल थोरात (वय 24, रा. थोरात वस्ती, वडगाव पान, ता. संगमनेर), किरण संजय काळे (वय 19, रा. माळेगाव हवेली, ता. संगमनेर) व गणेश चंद्रभान गायकवाड (वय 26, रा. खांडगाव, ता. संगमनेर) या तिघांना पकडले. तर अजित अरुण ठोसर उर्फ करमाळ्या (रा. मातकोळी, ता. आष्टी, जि. बीड) व भैय्या राऊत (पूर्ण नाव माहीत नाही) हे दोघे पसार होण्यात यशस्वी झाले.

पोलिसांनी त्यांच्याकडून 15 हजार रुपयांचा गावठी कट्टा व आठशे रुपये किमतीचे चार जिवंत काडतुसे, लाल रंगाची मिरची पावडर, 15 व 20 हजार रुपये किमतीचा मोबाइल, 50 हजार रुपये किमतीचे प्रत्येकी दोन आयफोन, 3 लाख 10 हजार रुपये किमतीची कार, दोनशे रुपये किमतीचा कोयता, सुताची दोरी, सहाशे रुपये किमतीचे तीन प्लास्टिकचे ड्रम असा एकूण 4 लाख 61 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोहेकॉ. संपत जायभाये यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील पाच जणांवर भारतीय न्यायसंहिता कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शलमोन सातपुते हे करत आहे.

Web Title: Sangamner taluka police nabbed three robbers, two escaped

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here