6 जणांचा गळफास, एकाची 8व्या मजल्यावरून उडी, 7 घटनांनी शहर हादरले
Pune Suicide Case: 6 जणांनी गळफास लावून घेतला तर आणखी एकाने आठव्या मजल्यावरून उडी आत्महत्या केल्याच्या घटना.
पुणे : पुणे जिल्ह्यात एकाच दिवशी या 7 वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. 6 जणांनी गळफास लावून घेतला तर आणखी एकाने आठव्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं (Suicide) आहे. उद्योग नगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकाच दिवशी सात जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी आयुष्य संपवलं आहे. या सर्व घटना 27 जानेवारी रोजी घडल्या आहेत. या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
भोसरीच्या लांडगे आळी परिसरात विकास रामदास मुरगुंड या 35 वर्षांच्या तरुणाने दुपारी 12 वाजता गळफास लावून घेतला.
मुळशी तालुक्यातील नेरे गावात सकाळी 9.45 वाजण्याच्या दरम्यान मनाप्पा सोमल्ल्या चव्हाण या 52 वर्षांच्या नागरिकाने घरा शेजारी असलेल्या लिंबाच्या झाडाला डोक्याचा फडका बांधून गळफास लावून जीवन संपवलं.
नवनाथ भगवान पवार या 46 वर्षांच्या नागरिकाने थेरगावातील त्याच्या राहत्या घरी रात्री 12.45 च्या सुमारास गळफास लावून घेतला.
चाकण परिसरात 28 वर्षांच्या गौरव ज्ञानेश्वर अगम याने घरातील खिडकीच्या ग्रीलला ओढणी बांधून सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास जीवन संपवलं.
पुनावळे भागात प्रसाद संजय अवचट या 31 वर्षांच्या तरुणाने दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास गळफास लावून घेतला.
जुनी सांगवी परिसरात 36 वर्षांच्या सुवर्णा श्रीराम पवार या महिलेने रात्री 11.45 वाजता राहत्या घरात पंख्याला गळफास घेतला.
चिखली परिसरात इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून 40 वर्षांच्या दिनेश सुरेश लोखंडे यांनी संध्याकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास जीवन संपवलं.
Web Title: Suicide Case 6 hanged, one jumped from 8th floor
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News