अहिल्यानगर: चिमुकलीस तरुणाने घरात नेवून तिच्यासोबत अश्लील चाळे
Breaking News | Ahilyanagar Crime: पाच वर्षीय चिमुकलीस आरोपी तरुणाने त्याच्या घरात नेवून तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याची घटना नुकतीच घडली.
राहुरी: शहरातील एका परिसरात राहणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीस आरोपी तरुणाने त्याच्या घरात नेवून तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी येथील राहुरी पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तिच्या कुटूंबासह शहरातील एका परिसरात राहते. सदर फिर्यादी महिला (दि. २४) रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान, कामानिमित्त घरातून बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची पाच वर्षीय नात घरात एकटीच खेळत होती. सदर महिला काही वेळातच घरी गेल्या असता, त्यांची नात घरात दिसली नाही. त्यावेळी त्यांनी शेजारच्या घरात दरवाजातून डोकावले असता, आरोपी त्या मुलीसोबत अत्याचार करताना दिसून आला. त्यावेळी फिर्यादी महिलेने त्याला हाथाने मारहाण केली. त्यावेळी आरोपी तरुणाने फिर्यादी महिलेला फायटरने मारहाण केली. तसेच त्याची आई आरडाओरडा ऐकून तेथे आली. आणि तिने फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून दमदाटी केली. या घटनेत फिर्यादी महिलेच्या डोक्यात मार लागुन त्या गंभीर जखमी झाल्या आहे. फिर्यादी महिलेने न्याय मिळवून देण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. घटनेनंतर फिर्यादी महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी तरुण व त्याच्या आई, अशा दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. सदर घटनेनंतर आरोपी पसार झाला असून पोलीस पथक त्याचा शोध घेत आहे.
Web Title: young man took her home and sexually assaulted her
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News