अहिल्यानगर: नोकरदारावर हनीट्रॅप, प्रेमाच्या जाळ्यात ओढून खंडणी, तरुणीसह चौघांना अटक
Ahilyanagar HaneyTrap: होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ‘हनीट्रॅप’ करणार्या बीडच्या टोळीला अटक.
अहिल्यानगर: तरूणीने तिच्या बीड जिल्ह्यातील मित्रांच्या मदतीने अहिल्यानगरमधील एका नोकरदाराला ‘हनीट्रॅप’ च्या जाळ्यात अडकविल्याची घटना एमआयडीसी हद्दीत घडली आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ‘हनीट्रॅप’ करणार्या बीडच्या टोळीला अटक केली आहे. तरूणीसह चौघांचा यामध्ये समावेश आहे. मयुर मधुकर ढोले (वय 27, रा. सुयोग अपार्टमेंट, शिवाजीनगर, बीड), अभिजीत शंकर गलधर (वय 27, रा. सिध्देश्वर, एमआयडीसी, बीड), नितीन स्वामी डांगरे (वय 26, रा. बुरूडगल्ली, हिरालाल चौक, बीड), प्रियांका पांडुरंग ढलपे (रा. बीड) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.
फिर्यादी सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्ता परिसरात राहत असून खासगी क्षेत्रात नोकरी करतात. त्यांची प्रियांका सोबत ओळख झाली होती. तिने त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दरम्यान, ते दोघे शुक्रवारी (24 जानेवारी) सायंकाळी एमआयडीसी परिसरातील एका मोकळ्या पटांगणात भेटले. त्याच वेळी प्रियांकाचे साथीदार तेथे आले व त्यांनी मारहाण केली. जबरदस्तीने फिर्यादीच्या फोन पे खात्यातून 1 लाख रुपये ट्रान्सफर करून घेतले. तसेच दोन तोळ्याची सोन्याची चेन, पाच ग्रॅमची अंगठी, कागदपत्रे असा एक लाख 75 हजारांचा ऐवज लुटला. त्यांचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
दरम्यान, याप्रकरणी फिर्यादीने एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार सुरेश माळी, पंकज व्यवहारे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, महादेव भांड यांच्या पथकाने तपास करून संशयित आरोपींना बीड जिल्ह्यातून ताब्यात घेतले. त्यांनी प्रियांकाच्या मदतीने फिर्यादीला लुटल्याची कबूली दिली. अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.
Web Title: Honeytrap on the servant, extortion by dragging him into the web of love
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News