Home पुणे 100 फूट दरीत कोसळली कारः एकाचा मृत्यू, 8 प्रवासी गंभीर जखमी

100 फूट दरीत कोसळली कारः एकाचा मृत्यू, 8 प्रवासी गंभीर जखमी

Pune Accident: वरंधा घाटात 100 फूट दरीत कोसळली कारः एकाचा मृत्यू, 8 प्रवासी गंभीर जखमी.

Car plunges into 100-foot ravine one dead

पुणे: पुण्याहून भोरमार्गे महाडकडे जाणाऱ्या महामार्गावर सोमवारी (२७ जानेवारी) सकाळी एका कारचा भीषण अपघात झाला. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव कार १०० फूट खोल दरीत कोसळली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, महाडवरून नऊ प्रवाशांना घेऊन कार भोरकडे निघाली होती. पहाटे ४ वाजता कार वरंधा घाटात उंबर्डे गावाच्या हद्दीत असताना कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार १०० फूट खोल दरीत कोसळली.

कारचा अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी मदत कार्य सुरू केले. यात एक मृतदेह आणि ८ जखमींना बाहेर काढण्यात आले. या घाटात सातत्याने अपघाताच्या घटना घडत असतात.

Web Title: Car plunges into 100-foot ravine one dead

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here