Home अकोले अकोले: अल्पवयीन मुलीला शेतात नेऊन अतिप्रसंगाचा प्रयंत्न

अकोले: अल्पवयीन मुलीला शेतात नेऊन अतिप्रसंगाचा प्रयंत्न

Breaking News | Akole Crime: प्राथमिक शाळेतील मुलीस फसवून दुचाकीवर शेतात नेऊन अतिप्रसंग करू पाहणाऱ्या विकृत तरुणास पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने पकडले.

Attempted extortion by taking the minor girl to the farm

अकोले: तालुक्यातील एका गावात प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी शाळेतून आपल्या घरी जात असलेल्या प्राथमिक शाळेतील मुलीस फसवून दुचाकीवर शेतात नेऊन अतिप्रसंग करू पाहणाऱ्या विकृत तरुणास पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने पकडले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शनिवारी (दि. २५) ९ वर्षाची मुलगी शाळेतून घरी जात होती. तिला विकृत अविवाहित मोटारसायकलस्वार तरुणाने फसवून गाडीवर बसवून निर्जन शेतात नेले व तेथे अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. चिमुकलीने त्या नराधमाच्या हाताला चावा घेत आपली सुटका करून घेतली व रस्त्याच्या दिशेने पळ काढला. धाप लागल्याने ती रस्त्याकडेला पडली. सुदैवाने तिचे वडील तिला शाळेतून घरी नेण्यासाठी याच रस्त्याने येत होते. मुलीने घडलेला प्रसंग वडिलांना सांगितला. वडिलांनी आरोपीचा पाठलाग केला. ही बाब गावात कळल्यावर अफवांचे पेव फुटले. गावातील तरुणांनी रस्त्याच्या कडेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. पहाटे चारपर्यंत गावातील तरुणांच्या मदतीने पोलिसांनी शोध सुरू केला. तपासात दुचाकीच्या क्रमांकावरून पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले. अधिक तपास पोलीस करीत आहे. 

Web Title: Attempted extortion by taking the minor girl to the farm

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here