Home अहमदनगर चर्चा तर होणारच: सुजय विखे पाटील आणि पार्थ पवार यांचा एकत्र विमान...

चर्चा तर होणारच: सुजय विखे पाटील आणि पार्थ पवार यांचा एकत्र विमान प्रवास

Sujay Vikhe Patil And Parth Pawar in one aeroplane

Ahmedanagar: विखे पाटील आणि पवार या दोन्ही कुटुंबातले वाद, जुन्या पिढीत एकमेकांशी असलेलं राजकीय वैर त्याचे काही दिवसांपूर्वी उमटलेले राजकीय पडदास या सर्व  गोष्टी महाराष्ट्राने पाहिलेले आहे. मात्र अशातच चर्चेचा विषय ठरतो तो म्हणजे सुजय विखे पाटील आणि पार्थ पवार यांनी केला एकत्र  विमान प्रवास तसेच त्यानंतर सुजय विखेंनी शेअर केलेला फोटो.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ सुजय विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची काल औरंगाबाद विमानतळावर भेट झाली. सुजय विखे आणि पार्थ पवारांनी एकाच विमानाने प्रवासही केला.

औरंगाबाद ते मुंबई असा त्यांचा प्रवास होता. सुजय विखे पाटलांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या प्रवासाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते पार्थ पवार यांच्यासोबत विमानात बसलेले दिसत आहेत. 
भाजपा नेते आणि कॉंग्रेस राष्ट्रवादी नेते नेहमी एकमेकांवर टीका व चिखलफेक करीत असतात मात्र काल जो फोटो पाहायला मिळाला त्यामुळे चर्चेला उधाण आहे. 
Web Title: Sujay Vikhe Patil And Parth Pawar in one aeroplane

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here