छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; अकोलेत रास्ता रोको
Breaking News | Akole: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या तालुक्यातील आंबड येथील गवणेर सरोदे याचा निषेध नोंदवून त्यास अटक करून कारवाई करा.
अकोले : एकीकडे तालुकाभर तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव साजरी होत असताना अकोले तालुक्यातील छत्रपतीप्रेमींनी अकोले शहरात बाजारतळासमोर रास्ता रोको आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या तालुक्यातील आंबड येथील गवणेर सरोदे याचा निषेध नोंदवून त्यास अटक करून कारवाई करा, अन्यथा संपूर्ण तालुका बंद करून आंदोलन करू, असा इशारा आंदोलकांनी दिला.
रस्त्यावर मोटारसायकल टायर पेटवून सरोदे याच्या प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करत निषेध व्यक्त करण्यात आला. सरोदे याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यामुळे सोमवारी सकाळी आंबड गावकऱ्यांनी गावात ग्रामसभा घेत सरोदे याचा निषेध केला. अकोले पोलिस ठाण्यात येऊन गावकऱ्यांनी पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांना निवेदन देत सरोदे यास अटक करण्याची मागणी केली. सरपंच सुरेखा हासे, उपसरपंच प्रमोद भोर, माजी सरपंच रेश्मा कानवडे, माजी उपसरपंच नाथा भोर, रोहिदास भोर, संदीप भोर यांच्यासह गावकरी उपस्थित होते. त्यानंतर अकोले बाजारतळ समोर रास्ता रोको करण्यात आला. तसेच टायर पेटवून सरोदे याच्या प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करण्यात आले.
Web Title: Offensive statement about Chhatrapati Shivaji Maharaj