संगमनेर: लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
Breaking News | Sangamner Suicide: खंडोबा माळ परिसरातील वनविभागात एका अनोळखी तरुणाचा लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
संगमनेर: संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगांव गावाच्या हद्दीत खंडोबा माळ परिसरातील वनविभागात एका अनोळखी तरुणाचा लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. (बुधवार दि. ९ एप्रिल) सकाळी ही घटना समोर आली आहे.
योगेश भारत आहीरे (वय २५ वर्षे, रा. रामतीर, पो. करे, ता. बागलाण, जि. नाशिक) असे मयत तरुणाचे नाव आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, सदर तरुण पुण्यात एका सुरक्षा कंपनीत कामाला होता आणि तो आपल्या गावी जात असतानाही घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे.
घारगांव परिसरातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या खंडोबा माळ परिसरातून सकाळी ये-जा करणाऱ्या नागरिकांना लिंबाच्या झाडाला एक मृतदेह लटकलेला दिसला. कुरकुंडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष पप्पू चौगुले यांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि घारगांव पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच घारगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस कॉन्स्टेबल बाबू गोडे, महादेव हांडे, आणि चालक सुरेश मुसळे यांनी त्वरित घटनास्थळ गाठले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठवला. अधिक तपास घारगाव पोलीस करीत आहे. अद्याप नेमके कारण समोर आलेले नाही.
Web Title: Young man commits suicide by hanging himself from a lemon tree