Home महाराष्ट्र लैंगिक अत्याचार करून अल्पवयीन मुलीची हत्या

लैंगिक अत्याचार करून अल्पवयीन मुलीची हत्या

Breaking Crime news: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या, मुंब्रा येथील घटना, काही तासात आरोपीला अटक.

Minor girl sexually assaulted and murdered

मुंब्रा : मुंब्यातील ठाकूरपाडा भागातील सम्राटनगर परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला अवघ्या काही तासांत पोलिसांनी अटक केली.

सम्राटनगर परिसरात इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहात असलेल्या असिफ अकबर मन्सूरी (१९) याने सोमवारी रात्री याच परिसरात मैत्रीसह खेळत असलेल्या एका १० वर्षाच्या अल्पवयीन मुलीला खेळणी देण्याचे आमिष दाखवून त्याच्या घरी नेले. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नंतर त्याने तिच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याने मुलीला खिडकीतून इमारतीच्या डकमध्ये फेकले. डकमध्ये काही पडले असल्याचा आवाज झाल्यामुळे इमारतीमधील एका रहिवाशाने पहिल्या मजल्यावरील खिडकीतून खाली बघितले असता, त्यांना डकमध्ये अर्धनग्न अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळून आला. त्याने ही बाब इतर रहिवाशांच्या निर्दशनास आणून दिली.

गुन्हा केला कबूल

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात लैंगिक अत्याचार, तसेच तिचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आल्यानंतर, पोलिसांनी आरोपीच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपीने गुन्हा कबूल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली.

Web Title: Minor girl sexually assaulted and murdered

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here