संगमनेरात भर उन्हात पाण्यासाठी महिलांची गर्दी, साहेब तुम्हीच सांगा…. निवडणुका अन…
Breaking News | Sangamner: ‘साहेब तुम्हीच सांगा, आमचा कायमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तरी कधी मिटणार? अशा व्यथा.
संगमनेर : कामाला गेल्यावर पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे पाणी भरण्यासाठी रोजंदारी बुडून घरी थांबावे लागते. नुकताच पिण्याच्या पाण्याचा टँकर टाकीत खाली झाला आहे. यामुळे पाणी भरण्यासाठी महिलांनी भर उन्हात गर्दी केली. ‘साहेब तुम्हीच सांगा, आमचा कायमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तरी कधी मिटणार? अशा व्यथा कर्जुले पठार (ता. संगमनेर) हौसाबाई पडवळ, स्वप्नाली गोडसे या महिलांनी मांडला आहे.
उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाणीटंचाईही मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक गावांसह वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे टँकरही सुरू आहेत. कर्जुले पठार येथे टँकर सुरू आहे; मात्र टँकरचे पाणी पुरत नसल्याचे महिलांनी सांगितले आहे. कामावर गेले की, मागे पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे रोजंदारी बुडून पाणी भरण्यासाठी घरी थांबावे लागते तेव्हा कुठे पाणी मिळते. मंगळवारी (ता.८) टाकीत टँकर खाली झाल्याने गावातील महिलांनी पाणी भरण्यासाठी टाकीवर गर्दी केली होती. यामध्ये वयोवृद्ध महिलांचाही समावेश आहे.
साहेब जो पाण्याचा टँकर येतो, तो छोटा आहे. यामुळे आम्हाला पाणी पुरत नाही, मोठा टँकर भरून पाणी पाठवले पाहिजे, पाण्यावरून आमच्या महिलांमध्ये भांडणे होतात. उन्हाळा म्हटला की, अशीच परिस्थिती निर्माण होते. काही दिवसांवर आमच्या गावची यात्रा येऊन ठेपली आहे. पाहुणे यात्रेला येत असतात. यासाठी पाणीही भरपूर लागत आहे. एकीकडे माणसांची तहान भागते, पण दुसरीकडे जनावरांना पाणी कोठून आणायचे? यामुळे कर्जुले पठार गावाचा कायमचा पाणीप्रश्न तरी कधी मिटणार आहे? अशा व्यथा महिलांनी मांडल्या.
उन्हाळा सुरू झाला की, पाणीटंचाई भासण्यास लगेच सुरुवात होते. कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची अशीच परिस्थिती आहे. सध्या पिण्याच्या पाण्याचा टँकर येत आहे. पण, तो छोटा आहे, यामुळे ते पाणी पुरत नाही. निवडणुका आल्या की, नेते मत मागण्यासाठी येतात. मात्र, कायमस्वरूपी आमचा पाणीप्रश्न सुटला पाहिजे. वयोवृद्ध महिला, कर्जुले पठार
Web Title: Women crowding for water in the scorching sun, sir, you tell me…. Elections are