Home अहिल्यानगर अहिल्यानगर: देहविक्री करणाऱ्या हॉटेलचालकावर गुन्हा

अहिल्यानगर: देहविक्री करणाऱ्या हॉटेलचालकावर गुन्हा

Breaking News | Ahilyanagar Crime: हॉटेल बासरीवर कर्जत पोलिसांनी छापा टाकत देहविक्रीचा पर्दाफाश.

Crime against hotelier involved in prostitution

कर्जत: कर्जत तालुक्यातील करपडी शिवारातील हॉटेल बासरीवर कर्जत पोलिसांनी छापा टाकत देहविक्रीचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून, हॉटेल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार दि.४ रोजी सायंकाळी घडली.

कॉन्स्टेबल प्रताप देवकाते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. कर्जतचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी कॉन्स्टेबल तानाजी देवकते, सज्जन नाहेडा, प्रदीप

बोऱ्हाडे, प्रकाश दंडाडे, वैभव गांगर्डे व दीपाली भंडलकर यांचे विशेष पथक तयार केले. डमी ग्राहक आणि पंचांना हॉटेलवर पाठविण्यात आले.

काउंटरवर बसलेल्या सुरेंद्र महादेव सहारे (वय ३४, रा. पुसला, ता. वरुड, जि. अमरावती) याने बनावट ग्राहकाकडे पैशाची मागणी केली. तपासादरम्यान, हॉटेलमधील एका खोलीत परप्रांतीय महिला आढळून आली. तिची पोलिसांनी सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी सुरेंद्र सहारे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Crime against hotelier involved in prostitution

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here