भंडारदरा धरणातून पाण्याचे उन्हाळी आवर्तन
Bhandardara Water Rotation: भंडारदरा धरणातून उन्हाळी हंगामातील शेतीसाठीचे आवर्तन सोमवारी सुटणार असल्याची माहिती आमदार हेमंत ओगले यांनी दिली.
श्रीरामपूर : भंडारदरा धरणातून उन्हाळी हंगामातील शेतीसाठीचे आवर्तन सोमवारी सुटणार असल्याची माहिती आमदार हेमंत ओगले यांनी दिली आहे. तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. उन्हाची तीव्रता वाढल्याने शेती पिकांना पाण्याची गरज होती. मागील आवर्तनाला जवळपास ४० दिवसांचा कालावधी उलटला असल्याने विहिरींनी देखील तळ गाठला होता. शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
भंडारदरा व निळवंडे धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे. त्यामुळे तातडीने आवर्तन सोडल्यास निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे आमदार हेमंत ओगले यांनी म्हटले होते. सुटणारे आवर्तन जवळपास तीन आठवडे चालणार असून शेतकऱ्यांना सहकार्य करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
Web Title: Summer circulation of water from Bhandardara Dam