चिंता वाढली: अहमदनगर जिल्ह्यात आढळली उच्चांकी रुग्णसंख्या
अहमदनगर | Ahmednagar: नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव सुसाट सुटला आहे. करोना थांबता थांबेना त्यामुळे चिंता वाढली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालात उच्चांकी रुग्णसंख्या आढळून आली आहे.
जिल्ह्यात बुधवारी १६८० करोनाबाधित आढळून आले आहेत. गेल्या तीन चार दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनकडून काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी केली जात आहे.
बुधवारी प्राप्त अहवालानुसार मनपा क्षेत्रात ४३३, राहता २२९, श्रीरामपूर ११६, कोपरगाव ११४, संगमनेर १०५, कर्जत १०१, राहुरी ९२, नगर ग्रामीण ७४, पाथर्डी ६३, अकोले ६१, शेवगाव ६१, पारनेर ६०, नेवासा ५५, जामखेड ३७, श्रीगोंदा ३७, कॅन्टोनमेंट १६, मिलिटरी हॉस्पिटल १४, तर जिल्हयाबाहेरील १२ असे एकूण १६८० रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Ahmednagar Corona Highest Corona Patient 1680