अल्पवयीन मुलीवर सलग दोन आठवडे बलात्कार, मुलगी गर्भवती
राहुरी: राहुरी तालूक्यातील एका गावात आपल्या आजी आजोबांच्या घरी आलेल्या अल्पवयीन मुलीवर दोन आठवडे बळजबरीने बलात्कार(Rape) केल्याची घटना डिसेंबर २०२० दरम्यान घडली.
सदर पिडीत मुलगी गर्भवती असल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या आई वडिलांनी तिच्या आजी आजोबाकडे राहुरी येथे दिवाळीसाठी पाठविले होती. तेव्हा ती मुलगी राहुरी येथे आजी आजोबा सोबत राहत होती. डिसेंबर २०२० मध्ये पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात अल्पवयीन मुलगी घराच्या ओट्यावर रात्रीच्या वेळी एकटीच झोपलेली असताना आरोपी बाळासाहेब रोकडे याने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला.
तसेच कुणाला काही सांगितले तर तुला मारहाण करीन अशी धमकी देत वारंवार बलात्कार केला. गेल्या आठवड्यात पिडीत मुलगी तिच्या आई वडिलांकडे घरी कोपरगावला आली असता तिला त्रास होऊ लागल्याने ती गरोदर असल्याचे उघडकीस आले. तिच्या आईवडिलांनी तातडीने कोपरगाव पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. यावरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Web Title: Rahuri Rape of a minor girl