३१ मे नंतर लॉकडाऊन वाढणार का, मुख्यमंत्र्यांनी एकाच वाक्यात दिले संकेत
Coronavirus Lockdown News: राज्यातील लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी एकाच वाक्यात महत्वपूर्ण विधान करून दिले महत्वाचे संकेत.
राज्यात एप्रिल महिन्यात रोज ७० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत होते. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला ३१ मे नंतर लॉकडाऊन संपणार का असा प्रश्न पडला आहे. याबाबत मुख्यमंत्री यांनी महत्वाचे संकेत दिले आहे.
लहान मुलांसाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्समधील डॉक्टरांशी संवाद साधताना सूचक विधान केले आहे. पुढील काही काळात तिसरी लाट येईल आणि त्याचा सर्वाधिक फटका हा लहान मुलांना असे असा इशारा तज्ञांनी दिला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने बालरोग तज्ञांच्या टास्क फोर्सची स्थापना केली आहे. डॉक्टरांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे विधान केले आहे. कटूपणा घेण्याची माझी तयारी आहे असं अत्यंत सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
Web Title: After May Coronavirus Lockdown News