Home महाराष्ट्र शाळेत सोडतो म्हणून घेऊन गेला आणि चिमुकलीवर अत्याचार केला

शाळेत सोडतो म्हणून घेऊन गेला आणि चिमुकलीवर अत्याचार केला

Breaking News |Satara Crime: एका गावातील इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर.

took her as a school dropout and abused the child

सातारा | मायणी : सातारा येथून धककादायक बातमी समोर आली आहे. खटाव तालुक्यातील एका गावातील इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे,

याबाबत पोलिसांनी अधिक माहिती अशी दिली की,  चिमुकलीची आई २० सप्टेंबर रोजी मुलीला शाळेत सोडण्यासाठी उभी राहिली होती. त्यावेळी ओळखीचा एक व्यक्ती पाठीमागून गाडीवरून आला. त्यावेळी तो चिमुकलीच्या आईला म्हणाला, मी मुलीला शाळेत सोडतो असे म्हणून तिला गाडीवर बसवून घेऊन गेला. साडेअकराच्या सुमारास आईने शाळेत मुलगी आली का याची चौकशी केली असता शिक्षकांनी मुलगी आल्याचे सांगितले. त्यानंतर  शाळा सुटल्यानंतर चिमुकली घरी जात असताना हात पाय दुखतात मला उचलून घे, असे म्हटल्यानंतर आईने तिला उचलून घेतले व घरी आल्यानंतर घरातीलच असलेल्या औषध गोळ्या दिल्या मात्र दुसऱ्या दिवशीही अंग पाय दुखतंय अशी चिमुकली म्हणू लागली.

See also: Learn English

तिला एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी विश्वासात घेऊन चिमुकलीला विचारले. त्यावेळी तिने त्या व्यक्तीने मला शाळेत जाताना ओढ्याकडेला शेतात नेऊन गैरप्रकार केला. तसेच मला मारहाण केली व शाळेत पाठवले असा घडलेला प्रकार तिने सांगितला.

 या प्रकारानंतर चिमुकलीच्या आईने व नातेवाइकांनी वडूज पोलिस ठाण्यामध्ये संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला तत्काळ अटक केली. पोलिस उपनिरीक्षक वाघमारे व हवालदार नानासो कारंडे हे पुढील तपास करीत आहे.

Web Title: took her as a school dropout and abused the child

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here