Home संगमनेर संगमनेर: हातात कोयता घेऊन फिरणारा तरुण जेरबंद

संगमनेर: हातात कोयता घेऊन फिरणारा तरुण जेरबंद

Breaking News | Sangamner: हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणाला रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांनी जेरबंद.

Young man arrested for walking around with a sickle 

संगमनेर : हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणाला रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांनी जेरबंद केले. शहरातील बस स्थानक परिसरात ही कारवाई करण्यात आली. अतुल लखन पवार (१९) असे या तरुणाचे नाव आहे. रात्रीच्या सुमारास शहर

पोलिस बस स्थानकासह श्रीदत्त मंदिर परिसरात गस्त घालीत होते, बस स्थानकाच्या बाजूला एक तरुण संशयितरीत्या हातात कोयता घेऊन फिरत असल्याचे पोलिसांना दिसले. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, अतुल लखन पवार (१९)

आहे, असे त्याने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल  रामकिसन मुकेर यांनी फिर्याद दाखल केली. अतुल पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लोखंडे करीत आहे.

Web Title: Young man arrested for walking around with a sickle 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here