आ. अमोल खताळ यांचा लाल परीतून प्रवास..! संगमनेर बस स्थानकामध्ये ५ नवीन एसटी बसेस दाखल
Breaking News | Sangamner: संगमनेर आगारासाठी ५ नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. उर्वरित ५ एसटी बसेस लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला. (Amol Khatal)
संगमनेर : संगमनेर बस आगारासाठी दहा नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. त्यानुसार सरनाईक यांनी संगमनेर आगारासाठी ५ नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. उर्वरित ५ एसटी बसेस लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला.
संगमनेर आगारात एसटी बसेस कमी प्रमाणात असल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातून येणारे वृद्ध महिला यांना बस तुटवड्याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे संगमनेर आगारासाठी १० एसटी बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आमदार खताळ यांनी परिवहनमंत्री सरनाईक यांच्याकडे केली होती. सरनाईक यांनी संगमनेर रागारासाठी पाच बसेस तात्काळ तर पाच पुढच्या टप्प्यात उपलब्ध करून दिल्या जातील असे आश्वासन आमदार खताळ यांना दिले होते. त्यानुसार आज, शनिवारी संगमनेर आगाराला ५ नवीन एसटी बसेस दाखल झाल्या. त्या बसेसचे पूजन आमदार खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आले. त्यानंतर आमदार खताळ यांनी स्वतः बस मध्ये बसून प्रवास केला.
याप्रसंगी आमदार खताळ म्हणाले की संगमनेर बस स्थानकामध्ये ५ नवीन एसटी बसेस दाखल झाल्या. या एसटी बस मध्ये विधानसभा सदस्य यांच्यासाठी राखीव असलेल्या जागेवर बसून प्रवास केल्याचे मला समाधान आहे. मागील कालावधीत एसटी महामंडळ तोट्यात गेले होते मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या गेल्या आहेत.
महिलांना एसटीमध्ये ५० टक्के सवलत दिली गेली आहे. लाडक्या बहिणींचा एसटी कडे कल वाढला आहे. त्यामुळे तोट्यात गेलेले एसटी महामंडळ नफ्यामध्ये येत आहे. संगमनेर आगाराच्या विकासासाठी लागणारा निधी आणण्यासाठी या पुढील काळातही आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगून ते की एसटी बसमधून प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाने बस स्थानकाची आणि बसची स्वच्छता राखावी असे आवाहनही त्यांनी केले. त्याबरोबरच संगमनेर शहरातील वाहतूक समस्या गंभीर बनली आहे. याबाबत उपाययोजना करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार लवकरच संगमनेर शहरात स्वतंत्र वाहतूक शाखा कार्यान्वित केली जाईल आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविला जाईल अशी माहिती आमदार खताळ यांनी यावेळी दिली.
Web Title: Amol Khatal’s journey through the red fairy