२५ लाखांची खंडणी मागून तृतीयपंथीयाच्या घरात लपला
Breaking News | Beed Crime: २५ लाखांच्या खंडणीसाठी जालना जिल्ह्यातील एका वीटभट्टी मालकाचे अपहरण करून खंडणी न दिल्यास कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी.
केज (जि. बीड) २५ लाखांच्या खंडणीसाठी जालना जिल्ह्यातील एका वीटभट्टी मालकाचे अपहरण करून खंडणी न दिल्यास कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका आरोपीला शनिवारी रात्री उशिरा केज पोलिसांनी केज येथे जेरबंद केले. हा आरोपी एका तृतीयपंथीयाच्या घरात लपला होता.
आरोपी आकाश घुगे (रा. अहिल्यानगर) आणि त्याच्या इतर तीन साथीदारांनी २२ मार्च रोजी पहाटे जालना जिल्ह्यातील धानोरा येथील वीटभट्टीचे मालक निवृत्ती रामभाऊ तांगडे यांचे एका विनानंबरच्या जीपमधून अपहरण केले होते. डुकरी पिंपरी टोलनाक्याच्या बाजूला अंधारात अपहरणकर्त्यांनी निवृत्ती तांगडे यांची झडती घेऊन खिशातून १५ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. नाही दिली तर तुला व तुझ्या कुटुंबीयांना ठार मारून टाकू, अशी धमकी देऊन निवृत्ती तांगडे यांना घोडेगाव पाटी येथे जीपमधून खाली सोडून आरोपी पळून गेले. त्यानंतर पुन्हा दुपारी तांगडे यांना एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून धमकीचा फोन आला होता.
Web Title: transgender’s house after demanding a ransom of Rs 25 lakhs