Home औरंगाबाद नवऱ्यानेच बायकोला केलं मित्राच्या हवाली, दोघांचा आळीपाळीने अत्याचार

नवऱ्यानेच बायकोला केलं मित्राच्या हवाली, दोघांचा आळीपाळीने अत्याचार

Sambhajinagar Crime News: एक धक्कादायक घटना, पतीच्या सांगण्यावरून बलात्कार केल्याची घटना.

Husband handed over wife to friend, both of them took turns abused

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर मधील रांजणगाव येथे एक धक्कादायक घटना घडली. 34 वर्षीय पीडित महिला आपल्या पती, दोन मुली आणि एका मुलासोबत राहत होती. त्यांच्या शेजारी वाहिद पठाण नावाचा व्यक्ती राहत होता, ज्याला तिच्या पतीने आपला चांगला मित्र म्हणून ओळख करून दिली होती. पण नवऱ्याच्या मनात वेगळंच काहीतरी चाललं होतं. नवऱ्याने आपल्या बायकोला शेजाऱ्याच्या हवाली केलं.

2021 मध्ये, एक भयानक रात्र होती. पीडितेचे पती आणि वाहिद घरी आले. पतीच्या सांगण्यावरून वाहिदने तिच्यावर बलात्कार केला. नवऱ्यानेही तिला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. त्यावेळी तिची मुलं झोपलेली होती. त्या रात्री घडलेल्या अत्याचाराने पिडीत महिला हादरली होती. पतीने तिला धमकी दिली की जर याबद्दल कोणाला सांगितलं, तर तो तिच्या मुलांना मारून टाकेल. त्यामुळे ती खूप घाबरली होती आणि कोणाला काही सांगू शकली नाही.

पीडिता अनेक दिवस दहशतीत जगत होती. सतत तिला अत्याचाराला सामोरं जावं लागत होतं. तिला सतत आपल्या मुलांची काळजी वाटत होती. पण एक दिवस, तिच्या सहनशक्तीचा अंत झाला. आरोपींचा चिमुकल्या मुलीवर डोळा होता. त्यामुळे पिडित महिलेने आपल्या मुलीला वाचवण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी, तिनं थेट पोलीस स्टेशन गाठलं. तिथे तिने आपला पती आणि त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Husband handed over wife to friend, both of them took turns abused

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here