Home बीड चुलत भावाचे मुंडके छाटून दगडाने ठेचले, पाडव्याच्या दिवशीच ……

चुलत भावाचे मुंडके छाटून दगडाने ठेचले, पाडव्याच्या दिवशीच ……

Breaking News | Murder Crime: तलवार घेऊन त्रास देणाऱ्या चुलत भावाचे त्याच्याचकडील तलवारीने मुंडके छाटून आणि नंतर दगडाने ठेचण्यासारख्या निर्घृण खुनाच्या घटनेने बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला.

Crime Murder Mundake Beed

छत्रपती संभाजीनगर: तलवार घेऊन त्रास देणाऱ्या चुलत भावाचे त्याच्याचकडील तलवारीने मुंडके छाटून आणि नंतर दगडाने ठेचण्यासारख्या निर्घृण खुनाच्या घटनेने बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला. ही घटना ऐन गुढी पाडव्याच्या दिवशी सायंकाळी धारूर तालुक्यातील कन्नापूर (मोहा) येथील एका शेतात घडली. स्वप्नील उर्फ बबलू रामकिसन देशमुख (वय २८), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर संतोष आबा देशमुख असे खून करणाऱ्याचे नाव आहे. दोघेही परस्परांचे नात्यामध्ये चुलत भाऊ आहेत. दोघांमध्ये पूर्ववैमनस्य होते. हत्येनंतर संतोष देशमुखने नजीकचे सिरसाळा पोलीस ठाणे गाठून स्वतः हजर झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ज्या झाडाखाली रविवारची हत्येची घटना घडली त्याच झाडाला दोन वर्षांपूर्वी बबलूने संतोष देशमुखला मारहाण केली म्हणून संतोषचा एक भाऊ अविनाश उर्फ पापा देशमुखने आत्महत्या केली होती. पापाने आत्महत्या केला तो दिवस गुढी पाडव्याच्या दोन दिवसानंतरचाच होता.

रविवारीही (३० मार्च) रोजी बबलू तलवार घेऊन शेतात गेला होता. काहींच्या म्हणण्यानुसार बबलू नशेत होता आणि तो संतोषला त्रास देत होता. बबलू मुळेच आपला भाऊ पापाने आत्महत्या केली, ही सलही संतोषमध्ये सलत होती. अखेर त्रास वाढल्याने आणि तलवार हल्ला करण्यासाठी अंगावर धावून आलेल्या बबलूच्या हातातली तलवार घेऊन त्याव्दारेच संतोषने बबलूचे मुंडके छाटले.

या घटनेला आणखी एक पदर सांगितला जात असून, दोन वर्षांपूर्वी बबलू देशमुख याच्या मानसिक जाचास कंटाळून गावातीलच किराणा दुकानदार अविनाश देशमुख यांनी २३ मार्च २०२३ रोजी आत्महत्या केली होती. त्या प्रकरणी बबलू देशमुख याच्यावर गुन्हा दाखल होता. हा गुन्हा मागे घे म्हणून सांगण्यासाठी संतोष देशमुख याच्यावर बबलू दबाव आणत होता, असेही सांगण्यात येत आहे. घटनेनंतर संतोष देशमुख व त्याची पत्नी सोनाली देशमुख स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले.

Web Title: Crime Murder Mundake Beed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here