धक्कादायक! आत्याच्या नवऱ्याकडून दहा वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार
पुणे | Pune Crime: पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाघोली परिसरात माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. घरात पाहुणा म्हणून आलेल्या आत्याच्या नवऱ्याने स्वतःच्याच १० वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार (sexually abused) केले असल्याची माहिती समोर आली आहे.
या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने वाघोली परिसरात खळबळ उडाली आहे. दारुडा मामा घरात एकटा असताना त्याने खाऊ आणण्यासाठी घरातील इतर दोन लहान मुलांना पैसे देऊन घराबाहेर पाठविले. त्यानंतर घरात कुणी नसताना आरोपी मामाने स्वतःच्या दहा वर्षाच्या अल्पवयीन भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
मामा हा आत्याचा नवरा असून त्याला दारूचे व्यसन आहे. मामाचे हे कृत्य पीडितेच्या आईला माहिती होताच तिने तात्काळ लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपी मामा विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी मामा विरोधात लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे.
Web Title: Ten-year-old niece sexually abused by her husband