Home पुणे 15 वर्षाच्या मुलीला वेश्याव्यवसायात ढकललं, आमिष दाखवून अत्याचार

15 वर्षाच्या मुलीला वेश्याव्यवसायात ढकललं, आमिष दाखवून अत्याचार

Breaking News | Pune Crime: एका अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने दोन महिला आणि दोन पुरुषांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली.

15-year-old girl forced into prostitution, lured and abused

पुणे: पुण्यात एका अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने दोन महिला आणि दोन पुरुषांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.

१५ वर्षीय मुलीला चांगले शिक्षण आणि जीवन देण्याचे आमिष दाखवून, तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेण्यात आला. या प्रकरणी न्यायालयाने चौघांना दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी हा निकाल दिला.

या शिक्षेसोबतच, महिला आरोपींना प्रत्येकी २९ हजार ५०० रुपये, तर पुरुष आरोपींना प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पीडितेचा जबाब या खटल्यात महत्त्वाचा ठरला. सुनावणीदरम्यान, पीडितेचा जन्मदाखला सादर करण्यात आला नव्हता, परंतु सरकारी पक्षातर्फे शाळेतील निर्गम उतारा आणि शिक्षिकेची साक्ष नोंदविण्यात आली.

आपला अॅप आजच येथून अपडेट करा: अहिल्यानगर न्यूज 

कोमल सुनील मोरे उर्फ कोरे (वय २६, रा. कोथरुड, मूळ रा. भोर), रेश्मा महेश गायकवाड उर्फ रेश्मा सुरोसे (वय २९, रा. उत्तमनगर), सुनील ब्रिजलाल कोरी (वय २९, रा. येवलेवाडी, मूळ गाव उत्तर प्रदेश), आणि जसाराम भयाराम सुतार (वय ५७, रा. सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणात, अतिरिक्त सरकारी वकील नितीन कोंघे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांनी नऊ साक्षीदारांची तपासणी केली.

Web Title: 15-year-old girl forced into prostitution, lured and abused

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here