Home संगमनेर संगमनेरात मुख्याध्यापिकेस पेट्रोल टाकून जीवे मारण्याची धमकी

संगमनेरात मुख्याध्यापिकेस पेट्रोल टाकून जीवे मारण्याची धमकी

Breaking News  Sangamner Crime: एका शाळेच्या मुख्याध्यापिकेस तेथील उपमुख्याध्यापकाने पगार कपातीवरुन लक्ष्य करीत ‘पेट्रोल टाकून पेटवून देण्याची’ धमकी दिली.

Headmistress in Sangamnera threatened with petrol

संगमनेर: शहरातील एका शाळेच्या मुख्याध्यापिकेस तेथील उपमुख्याध्यापकाने पगार कपातीवरुन लक्ष्य करीत ‘पेट्रोल टाकून पेटवून देण्याची’ धमकी दिली आहे. हा उपमुख्याध्यापक वारंवार त्रासदायक प्रकार करत असल्याने वैतागलेल्या मुख्याध्यापिकेने संगमनेर शहर पोलिसांत धाव घेऊन सर्व प्रकार सांगितला. त्यावरुन पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करुन त्यास प्रतिबंधात्मक कारवाई करीत अटक केली आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुखदेव संपत हासे (रा. राजापूर) हा शिक्षक शहरातील एका शाळेत उपमुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. मात्र, त्याची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. नेहमीच मनमानी करत असल्याने त्याचा पंचायत समितीच्या शिक्षणाधिकार्‍यांनी पगार कापला. यावरुन चिडचिड झाल्याने त्याने संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेस अन्य चार-पाच शिक्षकांसह अडवून दमबाजी केली. तुम्ही माझा पगार दिला नाही तर मी शाळेच्या गेटमध्येच पेट्रोल टाकून जाळील, तुम्हाला शाळेत पाऊल ठेवू देणार नाही, अशी धमकी दिली. या सततच्या त्रासाला वैतागून मुख्याध्यापिकेने शहर पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिल्याने अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

आपला अॅप आजच येथून अपडेट करा: अहिल्यानगर न्यूज 

मात्र, त्याच्यावर हा तिसरा अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करीत अटक केली आहे. या घटनेने शिक्षण वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Headmistress in Sangamnera threatened with petrol

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here