Home अहिल्यानगर अहिल्यानगर: घरात नेऊन मारहाण करीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर: घरात नेऊन मारहाण करीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Breaking News | Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीवर मारहाण करत केला अत्याचार .

Abuse of a minor girl by taking her home and beating her

अहिल्यानगर:  शहरातील एका १५ वर्षीय मुलीवर घरात नेऊन मारहाण करत अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि. १९) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला. स्नेहालयाच्या मदतीने पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे.

संदीप आसाराम देशमुख (रा. ठाणगेमळा, नेप्तीनाका, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. त्याने पीडितेला घरी घेऊन जाऊन अत्याचार केला. पीडितेने त्यास प्रतिकार केला असता, आरोपीने तिला हाताने मारहाण केली. सदरचा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतरही त्याने पीडितेशी जवळीक साधत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

प्रतिकार केल्याने आरोपीने पीडितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भीतीपोटी मुलीने आई व इतर नातेवाइकांना काहीही सांगितले नाही. तिने शाळेत गेल्यानंतर वर्ग शिक्षिकेला घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी

स्नेहालय संस्थेशी संपर्क केला. स्नेहालयाच्या पथकाने शाळेत येऊन पीडितेला धीर दिला. त्यानंतर पीडितेने तोफखाना पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास तोफखाना पोलिस करीत आहेत.

Web Title: Abuse of a minor girl by taking her home and beating her

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here