Home अहिल्यानगर अहिल्यानगर: बारावीचा पेपर देऊन विद्यार्थिनी झाली गायब

अहिल्यानगर: बारावीचा पेपर देऊन विद्यार्थिनी झाली गायब

Breaking News | Ahilyanagar Crime: एका महाविद्यालयात गेलेली १७ वर्षीय मुलगी परत आलीच नाही.

अहिल्यानगर : अल्पवयीन मुलींना पळविण्याच्या घटना घडत असतानाच बारावीच्या पेपरसाठी शहरातील एका महाविद्यालयात गेलेली १७ वर्षीय मुलगी परत आलीच नाही.

मुलीला पळवून नेल्याची तक्रार नातेवाईकांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुरुवारी दिली. गुरूवारी बारावीचा पेपर होता. ती घरून पेपर देण्यासाठी नगर शहरातील एका महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर आली. पेपर संपल्यानंतर ती केंद्राबाहेर आली नाही. नातेवाईकांनी तिचा परिसरात शोध घेतला. मैत्रिणींकडे चौकशी केली. पण, ती मिळून आली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात मुलीला पळवून नेल्याची तक्रार दिली असून, भिंगार कॅम्प पोलिस मुलीचा शोध घेत आहेत.

Web Title: student disappeared after giving the 12th paper

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here