ब्रेकिंग! भंडारदरा धरणात बुडून तरुणाचा मृत्यू
Breaking News | Akole: पोहण्याचा आनंद घेणाऱ्या एका पर्यटकाचा भंडारदरा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना.
अकोले: पोहण्याचा आनंद घेणाऱ्या एका पर्यटकाचा भंडारदरा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. दोन मित्रां सोबत धरणात पोहताना त्याचा बुडून मृत्यू झाला आहे.
शिर्डी येथील तरुण आपल्या मित्रांसह तरुण पर्यटनासाठी भंडारदऱ्याला गेले होते. भंडारदरा धरण धरणाच्या पाण्यात उतरून पोहण्याचा आनंद घेत असताना या पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सद्दाम शेख,(वय 26, रा.पूनमनगर, शिर्डी) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
शिर्डी परिसरातील सहा तरुण भंडारदरा येथे पर्यटनासाठी आले होते. त्यातील काही जण भंडारदरा धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले असता त्यातील सद्दाम शेख हा तरुण पाण्यात बुडाल्याने त्याला जलसमाधी मिळाली आहे. राजूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन .स्थानिकांच्या मदतीने मयत सद्दाम चा मृतदेह पाण्यातून बाहेर काढलाअसून शवविच्छेदना साठी पाठविला आहे. त्याच्या या दुर्दैवी जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.
भंडारदरा परिसरात पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान यापूर्वी ही धरणात पर्यटक बुडून मृत्यू होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत त्यामुळे भंडारदरा धरण आता पर्यटकांच्या मृत्यूला निमंत्रण देणारे ठिकाण बनत आहे. धरणाच्या सुराक्षितेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Web Title: Youth dies after drowning in Bhandardara dam
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study