अहमदनगर: युवकाचा विजेचा धक्का बसून मृत्यू
Ahmednagar News: मुलाचा घराजवळील झाडाला बांधलेल्या वायरला हात लागून त्याला विजेचा धक्का (Electric Shock) बसला.
जामखेड: तालुक्यातील सातेफळ येथील इयत्ता नववीत शिकणारा हरी अशोक मोरे (वय (१६) या मुलाचा घराजवळील झाडाला बांधलेल्या वायरला हात लागून त्याला विजेचा धक्का बसला. त्याच्यावर खाजगी दवाखान्यात विजेचा उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला असून यामुळे सातेफळ व खर्डा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. खर्डा भागात एका महिन्यात तीन युवकांचा शॉक बसून मृत्यू झाला असून प्रशासनाचा ढिम्म कारभार व चव्हाट्यावर आला आहे.
खर्डा येथे सहा कोटी रुपये मिळत खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधून झाली आहे. फक्त पुन्हा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेला हा आहे दवाखाना फक्त शोभेची वस्तू बनला आहे. याठिकाणी साप चावल्यावर, व धक्का बसल्यावर तसेच पाण्यात बुडाल्यावर वैद्यकीय देण्यासाठी डॉक्टर , इंजेक्शन उपलब्ध , आरोग्य कर्मचारी कमी असल्याने तातडीची कोणतीही आरोग्यसेवा रुग्णाला नसल्याने आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ एकदा चव्हाट्यावर आला . यापूर्वीही वंजारवाडी येथील , बाळगव्हाण येथील शिकारे आता सातेफळ येथील हरी सातेफळ येथील मोरे या युवकांचा एक महिन्याच्या अंतराने विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत सामाजिक प्रबोधन होऊन होणाऱ्या घटना टाळण्यासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची जनतेतून मागणी होत आहे.
Web Title: Youth died due to electric shock
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App