अकोले: पिंपरकणे उड्डाणपुलावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या
Breaking News | Akole: एका तरुणाने पिंपरकणे उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना.
राजूर: अकोले तालुक्यातील देवगाव येथील एका तरुणाने पिंपरकणे उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. तिसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह आढळून आला आहे. पिंपरकणे उड्डाणपूल सुरू होऊन किमान पाच महिने झाले असतील तोच या तरुणाने या उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
संकेत हिरामण भांगरे (वय २५) असे या मयत तरुणाचे नाव आहे. देवगाव येथील संकेत हिरामण भांगरे याने शनिवारी दुपारी एकच्या सुमारास पिंपरकणे उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्या दिवसापासून राजूर पोलिसांनी त्याचा स्थानिकांच्या मदतीने शोध घेतला. अखेर तिसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह उड्डाणपुलाच्या जवळ राजूरच्या दिशेने मिळून आला आहे. सुभाष पवार, किसन पिचड, शरद पिचड आदी स्थानिकांच्या मदतीने व सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास नेहे, मुंडे, फटांगरे यांनी मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, या तरुणाने आत्महत्या का केली हे अजून स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी राजूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
Web Title: Youth committed suicide by jumping from Pimparkane flyover
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study