प्रेमप्रकरण: महिलेचा गळा चिरून खून करून युवक पोलीस ठाण्यात हजर
Aurangabad Murder Case: प्रेमप्रकरणातून एका महिलेचा गळा चिरून खून केल्याची घटना समोर आली आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात एका युवकाने महिलेचा गळा चिरून खून केल्याची घटना घडली आहे. हा खून प्रेम प्रकरणातून झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळी सिडको पोलीसांचे पथक दाखल झाले आहे.
या घटनेची प्राथमिक माहिती अशी की, सौरभ लाखे याने अंकिता श्रीवास्त या महिलेचा खून केला. त्यानंतर सौरभ स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा खून प्रेमप्रकरणातून झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. सध्या घटनास्थळी सिडको पोलीसांचे पथक दाखल झाले आहे. ते या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
Web Title: youth appeared in the police station after murder the woman by slitting her throat