Home पुणे नोकरीचे आमिष दाखवत तरुणींना पुण्यात आणलं अन् थेट कुंटणखान्यात…

नोकरीचे आमिष दाखवत तरुणींना पुण्यात आणलं अन् थेट कुंटणखान्यात…

Breaking News | Pune Crime: नोकरीच्या आमिष दाखवत तरुणींना पुण्यात आणून त्यांना वेश्या व्यवसायाला लावल्याचा धक्कादायक प्रकार.

young women were brought to Pune with the lure of a job and directly to Kuntankhana

पुणे : नोकरीच्या आमिष दाखवत तरुणींना पुण्यात आणून त्यांना वेश्या व्यवसायाला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात छापा कारवाई करून तब्बल अशा ५ तरुणींची सुटका केली आहे. ५ पैकी दोन तरुणींना त्यांच्याच पतीने पुण्यात आणून वेश्या व्यवसायाला लावल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

सुमी सौरभ बिश्वास (वय ३५, रा. मरगी गल्ली, क्रांती चौक, बुधवार पेठ, मुळ रा. बोनगाव, जि. चातपाडा, कोलकाता), कुंटणखाना मॅनेजर विक्रम आसीम बिश्वास (वय २३, रा. मरगी गल्ली, बुधवार पेठ), किकास उजल मंडोल (वय २१), टॉनी युनुस मुल्ला (वय ३२) यांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. याबाबत अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कक्षाचे पोलीस हवालदार रेश्मा कंक यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फ्रिडम फर्म संस्थेचे प्रतिनिधी अब्राहम शशिकांत हेगडे, रेश्मा सुरेंद्र तुपकर, सिमा अजय आरोळे यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांना बुधवार पेठेतील कुंटणखान्यात अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात आहे, अशी माहिती दिली. तसेच, इतरही गोष्टींबाबत त्यांना कळविले. उपायुक्त निखील पिंगळे यांनी गंभीर दखल घेत लागलीच अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. तसेच, त्यांना योग्य ते मार्गदर्शन देखील केले.

त्यानुसार पथक हे बुधवार पेठेत गेले. अब्राहमने वाड्यातील एक घर दाखविले. दरवाजात कुंटणखाना चालिका सुमी बिश्वास बसली होती. पोलिसांनी तेथे छापा घालून तपासणी केली. त्यात पाच तरुणी आढळून आल्या. त्यांची सुटका करत चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर फरासखाना पोलिसांत गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे.

एका मुलीने तिच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने तिच्या मैत्रिणीकडून बुधवार पेठ येथे काम केल्यास जास्त पैसे मिळतील असे सांगितले. त्यामुळे ५ महिन्यापूर्वी ती पश्चिम बंगालमधून येथे आली. दुसर्‍या तरुणीच्या माहितीनुसार मुंबईत घरकाम करत असे, जादा पैशांच्या आमिषाने तिला येथे आणण्यात आले. तर एकीला जयपूरहून येथे आणले आहे. चौथ्या तरुणीला तिचा पती टॉनी याने कुंटणखाना चालिकेला सांगून वेश्या व्यवसायाला लावले. पश्चिम बंगालमधील १९ वर्षाच्या तरुणीबरोबर विशाल मंडोल याने लग्न केले. नंतर तो तिला गावाहून पुण्यात घेऊन आला व तिला वेश्या व्यवसायाला लावले. ग्राहकांकडून मिळणार्‍या ५०० रुपयांपैकी २५० रुपये सुमी बिश्वास व मॅनेजर विक्रम बिश्वास ठेवून घेत होते. पोलीस निरीक्षक अजित जाधव अधिक तपास करीत आहेत.

Web Title: young women were brought to Pune with the lure of a job and directly to Kuntankhana

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here