काम देण्याचे सांगत तरुणींना लोटले वेश्या व्यवसायात, उच्चभ्रू वस्तीतील व्यवसायाचा पर्दाफाश
Breaking News | Akola Crime: उच्चभ्रू वस्तीत वेश्या व्यवसाय चालविला जात होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापेमारी करत सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा खदान पोलिसांनी पर्दाफाश.
अकोला : अकोल्यातल्या उच्चभ्रू वस्तीत वेश्या व्यवसाय चालविला जात होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापेमारी करत सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा खदान पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून ३ तरुणी आणि २ महिलांची सुटका केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अकोला शहरातील गौरक्षण रस्त्यावरील कीर्ती नगरात हा वेश्या व्यवसाय सुरू होता. याठिकाणी असलेल्या तरुणी गरिब कुटुंबातील असून त्यांना काम देण्याचे आमिष दाखवले. नंतर अधिक मोबदल्याचे प्रलोभन देत या तरुणींना वेश्या व्यवसायात ढकलण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याचा गैरफायदा घेत हा वेश्या व्यवसाय चालवल्या जात होता. पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाईल आणि वाहन असा एकत्रित सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दोन हजार रुपयांपर्यंत चालायचा देहविक्रीचा व्यवसाय
याठिकाणी चालविण्यात येत असलेल्या व्यवसायात ग्राहकांकडून ५०० ते २ हजार रुपये घेत या तरुणी आणि महिला देहविक्रीचा व्यवसाय चालवत असल्याचे समोर आले आहे. उच्चभ्रू वस्तीतील देहविक्रीच्या व्यवसायाबद्दल खदान पोलिसांना माहिती मिळाली. दरम्यान, सुरुवातीला मसाज पार्लरच्या नावाखाली हा गोरखधंदा चालायचा. काही दिवसातच याचे वेश्या व्यवसायात रूपांतर झालं. पोलिसांनी या ठिकाणी एक बनावट ग्राहक पाठवत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. रात्री उशिरा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला.
Breaking News: Young women lured into prostitution by promising work