Home बीड बीड पुन्हा हादरलं! मेंढपाळ तरुणाची निघृणपणे हत्या

बीड पुन्हा हादरलं! मेंढपाळ तरुणाची निघृणपणे हत्या

Breaking News | Beed Crime: एका मेंढपाळ तरुणाच्या हत्येने बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला.

Young shepherd brutally murdered

बीड: पाटोदा पोलीस ठाणे हद्दीतील दगडवाडी येथे पहाटेच्या सुमारास एका मेंढपाळ तरुणाची निघृणपणे हत्या करण्यात आलीय. दीपक केरा बिल्ला असे मेंढपाळ तरुणाचे नाव असून हत्ये मागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून सध्या पंचनामा केला जातोय.

अधिक माहिती अशी की, घटनेतील मृतक दीपक बिल्ला हा मध्यप्रदेशातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी तो मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये आला होता. शिरूर तालुक्यातील दगडवाडी परिसरात त्याचे वास्तव्य होते. आज पहाटे अज्ञातानी त्याची हत्या केल्याचं समोर आलंय. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच एका तरुणाची हत्या झाली होती. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा मेंढपाळ तरुणाच्या हत्येने बीड हदरले आहे. तर जिल्ह्यात वारंवार सुरू असलेल्या खून, हाणामारी, आणि गुन्हेगारीच्या घटनेने पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.

Breaking News: Young shepherd brutally murdered

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here