Home अहमदनगर हॉटेलमधील कामगारांनी केला तरुणीवर सामुहिक अत्याचार

हॉटेलमधील कामगारांनी केला तरुणीवर सामुहिक अत्याचार

Ahmednagar Gang Abused:  हॉटेलवर कामाला असलेल्या तरुणांनी अत्याचार केल्याचे समोर आले. शिर्डी सामुहिक अत्याचार प्रकरण , जळगाव जिल्ह्यातून दोघांना अटक.

Workers in the hotel gang rape the girl

अहमदनगर:  स्नेहालय संस्थेतून निघून गेलेल्या तरुणीवर शिर्डी येथे हॉटेलवर कामाला असलेल्या तरुणांनी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. येथील एमआयडीसी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने 23 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पोलिसांकडून तपासाबाबत गोपनीयता बाळगली जात आहे. त्यांनी अटक केलेल्या आरोपींचे नावे सांगण्यास नकार दिला आहे.

नगर शहरातील स्नेहालय या संस्थेत राहत असलेली तरुणी रागाच्या भरात शिर्डीला निघून गेली होती. तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन पाच जणांनी तिच्यावर अत्याचार केला. या तरुणीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना तिने दिलेल्या जबाबावरून पाच जणांविरूध्द येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

स्नेहालयात राहत असलेली तरुणी 14 जुलै 2022 रोजी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास निघून गेली. त्यानंतर ती शिर्डी मंदिर परिसरात एकटीच राहत होती. शिर्डी येथे हॉटेलमध्ये काम करणार्‍या तरुणांनी त्या तरुणीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. हे तरुण जळगाव जिल्ह्यातील असून ते शिर्डीमध्ये राहत होते. त्यांनी दिवाळीचे आगोदर रात्रीचे वेळी जेवण देतो, असे सांगून तरुणीला त्यांच्या रूमवर घेऊन गेले. हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबला व तिच्यावर अत्याचार केला.

दरम्यान यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच अनोळखी आरोपींच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. सहाय्यक निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक यांनी मूळचे जळगाव जिल्ह्यातील व सध्या शिर्डीत वास्तव्यास असलेल्या दोन तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे चौकशीसाठी न्यायालयाने 23 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींचे नावे प्रसिध्द करण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे निरीक्षक आठरे यांनी सांगितले.

दररोज करू शकता १ हजार ते १५ हजार रुपयांची कमाई ते ही घरबसल्या ऑनलाईन | Earn Money Online

शिर्डी येथे तरूणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात दोन तरुणांना ताब्यात घेत अटक केली आहे. ते शिर्डी येथील हॉटेलमध्ये कामाला होते. इतर आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक केली जाईल.

– युवराज आठरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक.

Web Title: Workers in the hotel gang rape the girl

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here