अहिल्यानगर: कंटेनर-दुचाकीच्या अपघातात महिलेचा मृत्यू
Breaking News | Ahilyanagar Accident: जुपिटर दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या रामकृष्ण महाले व संगीता महाले (वय ५५) या दाम्पत्यावर कंटेनरचे मागील चाक चढल्याने संगीता महाले यांचा जागीच मृत्यू.
कोपरगाव: राहाता येथून नगरसुलकडे जात असलेल्या दाम्पत्याचा कोपरगाव येथील येवला नाका परिसरात दुर्दैवी अपघात झाला. जुपिटर दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या रामकृष्ण महाले व संगीता महाले (वय ५५) या दाम्पत्यावर कंटेनरचे मागील चाक चढल्याने संगीता महाले यांचा जागीच मृत्यू झाला, तर रामकृष्ण महाले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा भीषण अपघात गुरुवारी दुपारी सुमारे १२ वाजेच्या सुमारास घडला. नगरसुलकडे येत असताना हायवे लगत उभ्या असलेल्या उसाच्या आडतीमुळे हा अपघात झाला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्या परिसरात उसाचे ट्रक आणि ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून उभे राहतात, यामुळे वारंवार अपघातांची शक्यता निर्माण होते, अशी नागरिकांची भावना आहे.
घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस आणि रुग्णवाहिका त्वरीत दाखल झाली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी झाली होती. अपघातानंतर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी त्वरित दखल घेत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, पोलिसांनी उसाने भरलेला एक ट्रॅक्टर आणि एक ट्रक ताब्यात घेतला असून, यासंदर्भात चौकशी सुरू आहे.
Breaking News: Woman dies in container-bike accident