Home अकोले अकोले ब्रेकिंग: बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, महिला घरात झोपलेली असताना

अकोले ब्रेकिंग: बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, महिला घरात झोपलेली असताना

Akole bibatya Attack:  वृद्ध महिला घरात झोपलेली असताना बिबट्याने अचानक हल्ला करुन जंगलात ओढत नेऊन ठार केले.

Woman dies in Bibatya attack

अकोले प्रतिनिधी (२४ नोव्हेंबर):-अकोले तालुक्यातील निळवंडे परिसरातील खडके वस्ती येथील आदिवासी वृद्ध महिला बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची धक्कादायक घटना २४ नोव्हेंबर रोजी पहाटे घडली. वृद्ध महिला घरात झोपलेली असताना बिबट्याने अचानक हल्ला करुन जंगलात ओढत नेऊन ठार केले.या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

निळवंडे परिसरातील खडके वस्ती येथील रखमाबाई तुकाराम खडके (वय ६२) या घरात झोपलेल्या असताना पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवत त्यांना पाचशे फूट अंतरावरील जंगलात ओढून नेले.आवाज ऐकून त्यांचे नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी घराकडे धाव घेतली. त्यानंतर परिसरात सर्वत्र त्यांचा शोध घेतला असता त्या मृतावस्थेत आढळून आल्या. परिसरातील नागरिकांनी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Woman dies in Bibatya attack

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here