Home सोलापूर पतीने ज्या ठिकाणी आत्महत्या केली, त्याच ठिकाणी पत्नीची आत्महत्या

पतीने ज्या ठिकाणी आत्महत्या केली, त्याच ठिकाणी पत्नीची आत्महत्या

Breaking Suicide News: पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीनेही घेतला गळफास, विरह सहन न झाल्याने उचलले टोकाचे पाऊल.

Wife commits suicide at the same place where husband committed suicide

सोलापूर पतीने गुढीपाडव्याच्या दिवशी व्हॉट्सअॅपवर ‘सॉरी हर्ष माऊ’ असे स्टेटस ठेवून गळफास घेऊन आत्महत्या केली अन् लागलीच दुसऱ्या दिवशी पतीने ज्या ठिकाणी आत्महत्या केली, त्याच ठिकाणी त्याच पद्धतीने पत्नीने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना भगवान नगर झोपडपट्टी येथे सार्वजनिक पाण्याच्या टाकीजवळ सोमवारी रात्री १२:३० च्या सुमारास घडली.

पूजादेवी विनायक पवार (वय २५, रा. भगवाननगर, सोलापूर) असे मृत विवाहितीचे नाव आहे. पूजादेवीचा दीर विशाल पवार यांनी सांगितले की, विनायक याने भगवाननगर झोपडपट्टीजवळील सार्वजनिक पाण्याच्या टाकीला असलेल्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

तिथेच मध्यरात्री गळफास घेतला. दोघांच्या किरकोळ भांडणातून हा प्रकार घडला होता.

मात्र, पतीच्या निधनाचा विरह सहन न झाल्याने वहिनी पूजादेवी हिनेही तिच्यावर नातलगांनी पाळत ठेवलेली असतानाही सर्वांच्या नकळत त्याने ज्या पाण्याच्या टाकीच्या अँगलला गळफास घेतला, तिथेच मध्यरात्री गळफास घेतला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Wife commits suicide at the same place where husband committed suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here