साखर कारखाना निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढणार: आ. खताळ
Sangamner Sugar Factory Election 2025: शेतकरी व सभासदांचा मालकीचा करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी साखर कारखाना निवडणूक लढविणार असल्याची घोषणा आ. अमोल खताळ.
संगमनेर: संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना हा सभासद अन शेतकऱ्यांच्या मालकीचा होता. मात्र काहीं जग जणू काही हा कारखाना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे अशा प्रकारे कारभार सुरू केला. तो कारखाना पुन्हा शेतकरी व सभासदांचा मालकीचा करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी साखर कारखाना निवडणूक लढविणार असल्याची घोषणा आ. अमोल खताळ यांनी ऊस उत्पादक सभासदांच्या बैठकीमध्ये जाहोर करत संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा बिगुल वाजविला.
कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ऊस उत्पादक सभासदांच्या बैठकीत आमदार खताळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वसंतराव गुंजाळ, दादाभाऊ गुंजाळ, वैद्यकीय विकास आघाडीचे जिल्हाप्रमुख डॉ. अशोक इथापे, भाजप तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, संतोष रोहोन, विठ्ठलराव घोरपडे, रमेश काळे, रोहिदास साबळे, संघर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अॅड. संग्राम जोधळे, अॅड. गोरक्ष कानकर, बापूसाहेब देशमुख यांच्यासह उस उत्पादक सभासद उपस्थित होते.
आ. खताळ म्हणाले की, ज्याप्रमाणे हा साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचा होता. मात्र या साखर कारखान्यावर काहीं जण मालकी हक्क गाजवत आहे. तो कारखाना पुन्हा ऊत्त उत्त्पादक शेतकरी आणि सभासदाच्या ताब्यात द्यायचा आहे. त्यासाठी आता ही निवडणूक ऊस उत्पादक सभासदांनीच हातात घेतली आहे. त्यामुळे आपण सर्व जण ही निवडणूक पूर्णताकदीनिशी लढविणार आहोत. ही निवडणूक नुसती लढावयची नाही तर जिंकायची सुद्धा आहे. त्या दृष्टीने आपण सर्वजण मतदारा सभासद पर्यंत पोहोचण्याचे काम करावे असे आवाहन करत आ. खताळ म्हणाले की साखर कारखाना निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. अजून काही इच्छुक असतील त्यांची नावे लवकरात लवकर द्यावी असे आवाहन करून यानिवडणुकीच्या काळात कारखाना यंत्रणा गैरवापर होणार नाही याकडे लक्ष ठेऊन निवडणूक पारदर्शी होईल अशा सूचना प्रशासनाला देणार असल्याचे आ. खताळ यांनी सांगितले.
ज्येष्ठ नेते वसंतराव गुंजाळ म्हणाले की जशी विधानसभा निवडणूक लढवून आपण जिंकली आहे. तशीच संगमनेर भाग सहकारी साखरकारखान्याची सुद्धा निवडणुक लढवून जिंकायची आहे. त्या साठी धनाजी, संताजी, पुढारी हे कोणीच आपले उमेदवार राहणार नाही तर या निवडणुकीत सर्वसामान्य ऊत्त उत्पादक शेतकरी आणि सभासद हेच उमेदवार राहणार आहे. तर ही निवडणुक महायुती म्हणून नाही तर शेतकरी सत्ता परिवर्तन पॅनल या वॅनरखाली लढवणार आहोत. निवडणूक नपारदर्शी होण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात जमा करण्या बाबत आपण निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात अशी विनंती आमदार खताळ यांना करत ते म्हणाले की ज्या शेतकऱ्याचा ऊस गळीतला गेला आहे. अशाच ऊस उत्पादकांना निवडणुकीला उभे राहता येईल असेही गुंजाळ यांनी ठणकावून सांगितले. यावेळी अनेक उत्पादक सभासदांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Web Title: Sangamner Sugar Factory Election 2025