संगमनेर: व्यापाऱ्याची १९ लाखांची फसवणूक
Breaking News | Sangamner Fraud: १९ लाख २२ हजार ४३३ रुपयांची आर्थिक फसवणूक.
संगमनेर : राजस्थान येथील व्यापाऱ्याने संगमनेरातील व्यापाऱ्याची १२ लाख रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ललित रामचंद्र चंदावणी (रा. जोधपूर, राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
त्याच्याविरुद्ध संगमनेरातील व्यापारी भाऊसाहेब शंकर मेहेत्रे (वय ५२, रा. निंबाळे) यांनी फिर्याद दिली आहे. मेहेत्रे यांनी शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी केला. तो जोधपूर येथे चंदावणी याच्या राम टेडिंग कंपनीला त्याच्या ऑर्डरनुसार पाठवून दिला. मात्र, पाठविलेल्या टोमॅटोचे पेमेंट चंदावणी याने दिले नाही. १९ लाख २२ हजार ४३३ रुपयांची आर्थिक फसवणूक केली, असेही फिर्यादीत नमूद आहे. ३१ मार्चला संध्याकाळी गुन्हा दाखल झाला.
Web Title: Businessman cheated of Rs 19 lakhs