मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘भोंग्या’ वर उद्या गुन्हा दाखल करणार
Mumbai | विरार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते नव्हे भोंगा संजय राऊत यांनी माझी पत्नी डॉ. मेघा सौमय्या यांची बदनामी केल्याप्रकरणी उद्या सोमवारी ११ वाजता संपूर्ण कुटुंबासह मुलुंड पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार (Crime) दाखल करणार असल्याचे आज किरीट सोमय्या यांनी विरार येथे जाहीर केले.
सोमय्या (Kirit Sommaya) म्हणाले येत्या काळात ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचा नंबर लागणार आहे. मग तो मंत्री असो किंवा ठाकरे कुटुंबातील सदस्य. भ्रष्टाचारा केल्यामुळे नंबर तर लागणारच असे ते म्हणाले. कोरोना काळात ठाकरे सरकारने केलेला भ्रष्टाचार, १९ बंगल्याचे राजकारण, मनसुख हिरेन व सचिन वाझे यांच्या सुपारी प्रकरणावर भाष्य करत सोमय्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Web Title: Uddhav Thackeray’s ‘Bhongya’ will be charged Crime tomorrow