उध्दव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
Eknath Shinde Shivsena: उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश.
मुंबई : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी हे गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. याच कारणामुळे ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटात (Eknath Shinde ) प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते.
अशातच त्यांनी बुधवारी (12 फेब्रुवारी) पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा देत ठाकरेंची साथ सोडली. यानंतर ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले होते.
अशातच आज (13 फेब्रुवारी) राजन साळवी यांनी ठाण्यातील आनंद आश्रम येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणात मोठा धक्का बसला आहे.
Web Title: Uddhav Thackeray, the entry of a great leader into the Eknath Shinde group