Home महाराष्ट्र इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून उडी मारून दोन तरुणांची आत्महत्या

इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून उडी मारून दोन तरुणांची आत्महत्या

Breaking News | Virar Suicide: इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून उडी मारून दोन तरुणांनी सामूहिक आत्महत्या केली.

Two youths commit suicide by jumping from the 18th floor of a building

विरार : विरार पश्चिमेच्या बोळींज येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून उडी मारून दोन तरुणांनी सामूहिक आत्महत्या केली आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली कुठलीही चिठ्ठी पोलिसांना सापडली नाही. त्यामुळे आत्महत्येचे गूढ वाढले आहे.विरारच्या बोळींज येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी संध्याकाळी कामगार काम संपवून घरी गेले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास सुरक्षारक्षकाला जोरदार पडल्याचा आवाज आला. दोन तरुणांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनास्थळी अर्नाळा सागरी पोलिसांनी धाव घेतली. या मुलांची ओळख पटली आहे. शाम घोरई (20) आणि आदित्य रामसिंग (21) अशी या मुलांचे नावे आहेत.

पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदासाठी पाठविण्यात आले आहेत. ही दोन्ही मुले नालासोपारा येथील आचोळे परिसरात रहात होती. ते दोघे नालासोपारा येथील राहुल इंटरनॅशनल महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्गात होते. त्यांनी आत्महत्या का केली त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आम्ही याबाबत तपास करत आहोत, असे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Breaking News: Two youths commit suicide by jumping from the 18th floor of a building

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here