Home अहिल्यानगर अहिल्यानगर: नियंत्रण सुटल्याने दुचाकी गोदावरी नदीत कोसळली; एक ठार

अहिल्यानगर: नियंत्रण सुटल्याने दुचाकी गोदावरी नदीत कोसळली; एक ठार

Breaking News  Ahilyanagar Accident: भरधाव येणार्‍या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी गोदावरी नदीत कोसळली. या अपघातात तरुण ठार.

Two-wheeler falls into Godavari river after losing control one killed

कोपरगाव: भरधाव येणार्‍या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी गोदावरी नदीत कोसळली. या अपघातात तरुण ठार झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरूवारी पहाटे दोन वाजता घडला. जीत रामदास गर्जे (वय 25, रा. निवारा, कोपरगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

या अपघातात यश धुमाळ हा जखमी झाला असून त्याला नाशिक येथे उपचारार्थ दाखल केले आहे. जीत गर्जे व यश धुमाळ हे बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास दुचाकीवरून कोपरगावच्या दिशेने येत होते. गोदावरी नदीवरील शहरातील लहान पुलावरून येत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची दुचाकी पुलाच्या कठड्यावरून नदीत कोसळली.

काही वेळाने स्थानिक नागरिक तेथे पोहोचले, त्यांनी पोलिसांना घटना कळवली. पोलीस कर्मचार्‍यांनी स्थानिकांच्या मदतीने दोघांना बाहेर काढले. जीत गर्जे यास ग्रामीण रुग्णालयात नेले असता तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. डिकले यांनी मयत घोषित केले. जखमी यश धुमाळ यास प्रथम कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात व नंतर नाशिक येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तो गंभीर असल्याचे समजते. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Two-wheeler falls into Godavari river after losing control one killed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here