महिला पालकावर दोन शिक्षकांनी केला लैंगिक अत्याचार, तुमच्या मुलाला जास्त मार्क टाकून…..
Breaking News | Buldhana Crime: “तुमच्या मुलाला जास्त मार्क्स टाकून वर्गात पहिला नंबर आणून देतो, त्यासाठी आम्हाला खुश करावे लागेल, आमिष दाखवत एका महिला पालकावर दोन शिक्षकांनी वारंवार लैंगिक अत्याचार.
बुलढाणा: “तुमच्या मुलाला जास्त मार्क्स टाकून वर्गात पहिला नंबर आणून देतो, त्यासाठी आम्हाला खुश करावे लागेल….!” असं आमिष दाखवत एका महिला पालकावर दोन शिक्षकांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मलकापूर शहरात घडली आहे. मलकापूर शहरातील नामांकित असलेल्या नूतन विद्यालयातील शिक्षक समाधान इंगळे आणि अनिल थाटे यांनी एका महिला पालकाला आपल्या जाळ्यात ओढत हे कृत्य केलं आहे. तुझ्या मुलाला आम्ही भरपूर मार्क्स टाकून नेहमीसाठी वर्गात पहिला नंबर आणून देऊ.., त्यासाठी आम्हाला खुश करावा लागेल…! असं म्हणत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची ही संतापजनक घटना समोर आल्याने जिल्ह्यासह सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे . दोघांना न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाने दोन्ही शिक्षकांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे. दुसरीकडे या प्रकरणामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Breaking News: Two teachers sexually assaulted a female parent