Home अकोले अकोले येथे अवैध मद्य वाहतूक करणारे वाहन पकडले, राज्य उत्पादन शुल्क विभागाची...

अकोले येथे अवैध मद्य वाहतूक करणारे वाहन पकडले, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Breaking News | Akole: राज्य उत्पादन शुल्क विभागाने समशेरपूर फाटा (ता. अकोले) येथे अवैधरित्या वाहतूक होणारे मद्य पकडले असून एकावर गुन्हा दाखल, सव्वासहा लाखांचा मुद्देमाल जप्त.

transporting illegal liquor caught, State Excise Department action

संगमनेर: सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून प्रशासनाला कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत. त्यानुसार प्रशासन अॅक्टिव्ह मोडवर असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने समशेरपूर फाटा (ता. अकोले) येथे अवैधरित्या वाहतूक होणारे मद्य पकडले असून एकावर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत ६ लाख १४ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संगमनेर कार्यालयाने दिलेल्या माहितीवरून, राज्य उत्पादन शुल्क विभाग संगमनेरचे निरीक्षक सुनील सहस्त्रबुद्धे यांना समशेरपूर फाटा परिसरात अवैधरित्या मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने खात्रीलायक बातमीच्या अनुषंगाने सापळा लाबला असता चारचाकी वाहन (क्र. एमएच.१५, जेएम.५४४७) पाठलाग करून पकडले. या वाहनाची तपासणी केली असता देशी-विदेशी मद्याचे २५ खोके मिळून आले. याप्रकरणी विनोद संजय टापसे (वय २३, रा. ठाणगाव, ता. सिन्नर) याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सदर कारवाई दुय्यम निरीक्षक प्रशांत पाटील, कृष्णा सुळे, प्राची देखणे, सहायक दुय्यम निरीक्षक एस. एल. पाडळे, जवान अनिल मेंगाळ, सुशांत कासुळे, सरस्वती बराट, बिमल घोलप, मोहिनी घोडेकर यांनी केली. दरम्यान, आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग संगमनेर कार्यालयाने १५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत एकूण २४ गुन्हे दाखल करत २४ आरोपींना अटक केली आहे. तर दोन वाहने, देशी-विदेशी व ताडी असा एकूण ७ लाख ७८ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Web Title: transporting illegal liquor caught, State Excise Department action

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here