Home Accident News अहमदनगर: बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात, दोन ठार

अहमदनगर: बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात, दोन ठार

Ahmednagar Accident News : तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. यात दोन जण ठार तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना.

Three-vehicle freak accident on bypass, two killed

अहमदनगर: अहमदनगरमध्ये एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. नगर शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. यात दोन जण ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोलापूर-पुणे-कल्याण बायपासवर तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. सुरुवातीला बायपासवर ट्रेलर आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. यानंतर अपघातग्रस्त ट्रेलरला एका कारने मागून धडक दिली.  या भीषण अपघातात ट्रेलर आणि ट्रक ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारमधील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे बायपास रोडवर काही काळ वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून आले.

Web Title: Three-vehicle freak accident on bypass, two killed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here