Home अहिल्यानगर अहिल्यानगर: शॉर्टसर्किटमुळे तीन दुकाने जळून खाक

अहिल्यानगर: शॉर्टसर्किटमुळे तीन दुकाने जळून खाक

Breaking News | Ahilyanagar:  नगरपरिषदेच्या पत्र्यांच्या गाळ्यांना शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत मोबाइल शॉपी, स्वस्त धान्य दुकान व अन्य एक दुकान जळून खाक.

Three shops burnt down due to short circuit

कोपरगाव : शहरातील टिळकनगर परिसरातील नगरपरिषदेच्या पत्र्यांच्या गाळ्यांना शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत मोबाइल शॉपी, स्वस्त धान्य दुकान व अन्य एक दुकान जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली.

परिसरातील शनी टिळकनगर चौकात नगर परिषदेने तयार केलेले पत्र्याचे गाळे आहेत. यापैकी तीन दुकानांना शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास आगीने विळख्यात घेतले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत एजाज मन्सुरी यांच्या मोबाइल वर्ल्ड या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. दिवाळीनिमित्ताने त्यांनी मोबाइल विक्रीस आणले होते. यात त्यांचे लाखो रुपयांचे मोबाइल जळून खाक झाले. काही वेळातच शेजारी असलेल्या लहिरे

यांच्या स्वस्त धान्य दुकानालाही आगीने आपल्या विळख्यात घेतले. या दुकानातील अन्नधान्याची राख झाली आहे. तर चंद्रकांत मोरे यांच्या दुकानाचेही नुकसान झाल्याचे समजते. आग लागल्याची माहिती मिळताच कोपरगाव नगरपालिकेचा व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. फायरमन प्रमोद सिनगर, विशाल कासार, संजय विधाते, प्रशांत शिंदे यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दोन्ही पथकांनी तासाभराचे प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली. ही आग शॉर्टसकिटमुळे लागल्याचा अंदाज आहे. आगीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी.

Breaking News: Three shops burnt down due to short circuit

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here