Home जळगाव मायलेकासह तीन जणांचा बुडून मृत्यू

मायलेकासह तीन जणांचा बुडून मृत्यू

Breaking News | Jalgaon: तापी नदीवर आंघोळीसाठी गेलेला चिमुकला, त्याची आई आणि अन्य महिला अशा तीन जणांचा बुडून मृत्यू.

Three people including Mileka drowned

यावल (जि. जळगाव) : तापी नदीवर आंघोळीसाठी गेलेला चिमुकला, त्याची आई आणि अन्य महिला अशा तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना अंजाळे (ता. यावल) येथे घडली.

या महिला गोंधळासाठी येथे आल्या होत्या. नकुल सतीश भील (५), त्याची आई वैशाली सतीश भील (२८, रा.अंतुर्ली, ता. अमळनेर) आणि सपना गोपाल सोनवणे (२७, रा.पळाशी, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी मृतांची नावे आहेत. अंजाळे (ता. यावल) येथे तापी नदीच्या पात्राजवळ गोंधळासाठी हे लोक आले होते. कार्यक्रमानंतर नकुल व त्याची आई वैशाली आणि सपना अंघोळ व कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या. त्यावेळी नकुल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. त्याची आई आणि सोबतची महिला या दोघी त्याला वाचविण्यास गेल्या असता ही घटना घडली.

Web Title: Three people including Mileka drowned

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here