अहमदनगर: मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी
Breaking News | Ahmednagar: मुलीचे फोटो व्हायरल करून बदनामी करून जीवे मारण्याची धमकी दिली व दीड तोळा सोन्याची साखळी बळजबरीने काढून घेऊन मारहाण.
सोनई: मुलीचे फोटो व्हायरल करून बदनामी करून जीवे मारण्याची धमकी दिली व दीड तोळा सोन्याची साखळी बळजबरीने काढून घेऊन मारहाण केल्याप्रकरणी रूपेवाडी (ता. पाथर्डी) येथील तिघांवर सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत झापवाडी येथील ३८ वर्षीय इसमाने सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, आदिनाथ संजय मिठे याने मुलीबरोबर काढलेले फोटो दाखवून बदनामी केल्याने त्याला समजावून सांगण्याकरिता गेलो असता अविनाश संजय मिठ्ठठे, रवी संजय मिठे, संजय मच्छिंद्र मिड्डे (सर्व रा. रूपेवाडी, ता. पाथर्डी) यांनी शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केली व पाठीवर दगड मारून गळ्यातील दीड तोळा वजनाची सोन्याची साखळी बळजबरीने काढून घेतली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीबरोबरचे फोटो व्हायरल करून समाजात बदनामी करण्याची धमकी दिल्याने सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सोमनाथ झांबरे पुढील तपास करत आहे.
Web Title: Threatening to make the girl’s photos go viral
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study